अकोल्याहून चिखलीकडे परतणारी भरधाव इनोव्हा कार झाडावर आदळल्याने एकजण जागीच ठार, तर चारजण जखमी झाल्याची घटना आंबेटाकळी शिवारात ६ नोव्हेंबरच्या रात्री दोन वाजणाच्या सुमारास घडली.  चिखली येथील दत्तात्रय सुरडकर हा इनोव्हा गाडी (क्र. एमएच २८ व्ही. ४५०९) घेऊन जात असताना आंबेटाकळी फाटय़ानजीक त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळली.
ही ठोकर इतकी जोरदार होती की  यात गाडीमधील शिवा मोहिते हा जागीच ठार झाला, तर गाडीचा चालक सुरडकर तसेच इनोव्हा गाडीचे मालक निलेश अंजनकर, विशाल सोनवल व प्रितम गैची  हे चौघे जखमी झाले. हे सर्वजण चिखली गावातील रहिवासी आहेत.
याप्रकरणी भागवत देशमाने यांच्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी चालक सुरडकर याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

Story img Loader