अनधिकृत बांधकामे, हाणामाऱ्या प्रकरणी अटकेत असलेला भाजपचा मांडा-टिटवाळा येथील नगरसेवक बुधाराम सरनोबत गुरुवारी तुरुंग प्रशासनाची परवानगी घेऊन पोलीस बंदोबस्तात सर्वसाधारण सभेला उपस्थित होता. जामीन मंजूर होत नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून माजी उपमहापौर सरनोबत हे आधारवाडी तुरुंगात आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सलग तीन वेळा अनुपस्थित राहिले तर नगरसेवक पद रद्द होण्याची तरतूद आहे. ही कारवाई टाळण्यासाठी सरनोबत गुरुवारी तुरुंग प्रशासनाची परवानगी घेऊन सभेला उपस्थित होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-12-2013 at 01:07 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inpresoned carporator in kdmc meeting