परभणी महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर यांच्या विरोधात प्रदेश काँग्रेसचे सचिव बाळासाहेब देशमुख यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त विभागीय आयुक्त गोकुळ मवारे हे शुक्रवारी (दि. २८) परभणीत येत आहेत.
श्री. शंभरकर यांच्या विरोधात श्री. देशमुख यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीत महापालिकेचा गरकारभार व आयुक्त भ्रष्ट असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश नगरविकास खात्यास दिल्यानंतर ही चौकशी आता अतिरिक्त विभागीय आयुक्त मवारे हे करणार आहेत. शुक्रवारी श्री. मवारे महापालिकेत येऊन काही कागदपत्रांची तपासणी करणार असून नागरिकांच्या तक्रारीही स्वीकारणार आहेत.

Story img Loader