‘भाषाप्रभू पु. भा. भावे स्मृती समिती’च्या वतीने १३ ऑगस्टला घुमान मुक्कामी अलीकडे भरलेल्या ८८व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे आणि अंदमान येथे लवकरच भरणाऱ्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे या दोन दिग्गज लेखक-विचारवंतांच्या एकत्रित प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे.
‘भारताची सार्वभौमता, एकात्मता आणि नागरिकांनी पाळावयाची कर्तव्ये’ हा विषय असून मुलाखत घेण्याचे काम अधिवक्ता किशोर जावळे, क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी आणि पत्रकार स्वानंद ओक करणार आहेत. रात्री ८ वाजता दादरच्या शिवाजी मंदिर येथे मुलाखतीचा कार्यक्रम होईल. आघाडीचे लघुकथाकार, कादंबरीकार आणि विचारवंत पुरुषोत्तम भावे यांच्या ३५व्या पुण्यतिथीनिमित्ताने होणाऱ्या ह्य़ा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चित्रपट दिग्दर्शक राजदत्त भूषविणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असल्याचे कार्यवाह अरविंद कुळकर्णी यांनी कळविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा