आशा फॅन्स फाऊण्डेशनतर्फे चित्रपट संगीत आणि संगीतविषयक अनेक श्रवणसत्रे, कार्यक्रमांचे आयोजन वेळोवेळी केले जाते. लतादीदी आणि आशा भोसले यांची असंख्य गाणी रसिकांच्या ओठांवर रुळली आहेत. परंतु त्यांच्या भगिनी व गायिका उषा मंगेशकर यांची मोजकीच गाणी रसिकांना माहीत आहेत. म्हणूनच उषा मंगेशकर यांनी ७८ वर्षे पूर्ण केल्याचे औचित्य साधून रविवार, २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता डॉ. भालेराव सभागृह, साहित्य संघ मंदिर, केळेवाडी, गिरगाव येथे उषा मंगेशकर यांची चित्रपटगीते, भावगीते यावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आाले आहे.
उषा मंगेशकर यांचा मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सत्कार केला जाणार असून त्यांची प्रकट मुलाखत मंगला खाडिलकर घेतील. त्यानंतर उषा मंगेशकर यांनी गायिलेली अनेक गाणी अंजली नांदगावकर, मनीषा मंडपे-हर्षे, अवधूत रेगे आणि डॉ. मृदुला दाढे-जोशी सादर करतील. या कार्यक्रमाचे संगीतसंयोजन सुराज साठे यांचे आहे. उषा मंगेशकर यांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची कृष्णधवल दृकश्राव्य झलक दाखविण्यात येईल. अधिक माहितीसाठी संजय साठे (९८२१२९०७४६), शैलेश ओळकर (९६१९१००२७४), शैलेश देशपांडे (९००४६५१५८४) यांच्याशी संपर्क साधावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा