सुभाष कदम यांची माहिती
पालिकेतील शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाला शपथपत्रात स्वत:च्या मालमत्ताविषयक दिलेल्या प्रकरणांची चौकशी सुरूच असून, अद्याप आयोगाने म्हात्रे यांना चौकशीच्या फेऱ्यातून मोकळे सोडलेले नाही, अशी माहिती या प्रकरणातील तक्रारदार सुभाष कदम यांनी दिली आहे.
म्हात्रे यांनी आयोगाला दिलेल्या शपथपत्रात तीन ठिकाणच्या मालमत्तांची माहिती जाहीर न केल्याची तक्रार कदम यांनी आयोगाकडे केली आहे. यामधील दोन प्रकरणांची आयोगाने चौकशी करून म्हात्रेंना क्लीन चिट दिली आहे. दोन विषयांबाबत आयोगाने तक्रारीत तथ्य नसल्याचे म्हटले असले तरी आपला आणखी एक विषय आयोगाकडे प्रलंबित असून त्याचे निराकरण आयोगाने केलेले नाही, असे कदम यांनी सांगितले. अद्याप तिसऱ्या विषयाची चौकशी सुरूच आहे. आयोगाने कोणत्याही प्रकारची क्लीन चिट म्हात्रेंना दिलेली नाही, असा दावा कदम यांनी केला आहे. म्हात्रे यांच्या मालमत्तांप्रकरणी म्हात्रे यांनी दिलेल्या आयोगाच्या कागदपत्रांवरून ‘वृत्तान्त’मध्ये ‘वामन म्हात्रेंना निवडणूक आयोगाची क्लीन चिट’ या प्रसिद्ध झालेल्या बातमीबाबत कदम याने हा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा