नागपूर नगर पालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींना आमंत्रण देण्यात आले असून त्यांनी यासाठी वेळ देण्याचे मान्य केले आहे म्राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची नागपूर मुक्कामी महापालिकेच्या एका शिष्टमंडळाने भेट घेतली. नागपूर नगरपालिकेची स्थापना १८ जून १८६४ रोजी झाली. २ मार्च १९५१ रोजी तिचे महानगर पालिकेत रुपांतर झाले. शताब्दी १९६४मध्ये तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत साजरी झाली. आता दीडशे वर्ष पूर्ण होत असून शतकोत्तर सुवर्ण जयंती कार्यक्रम आपल्या उपस्थितीत साजरा व्हावा, अशी समस्त नागपूर शहराची भावना आहे. त्यासाठी सर्व नगरसेवकांनी आवाजी मतदानाने प्रस्तावही संमत केला आहे. १८ जून २०१३ ते १८ जून २०१४ यादरम्यान यासाठी आपण वेळ द्यावा व त्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला जाईल, अशी विनंती एका पत्राद्वारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना करण्यात आली. 

Story img Loader