सिंचन घोटाळ्याचे १४ हजार पानांचे पुरावे चितळे समितीसमोर सादर करताना भाजपचे नेते, त्यांचे खासदार व संबंधित ठेकेदार यांचे पुरावे देण्यास विसरले. भाजपचे विधान परिषदेतील आमदार मितेश भागडिया यांच्या एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ४०० कोटींची कामे देताना कायदे वाकविण्यात आल्याचे पुरावे चितळे समितीला देण्यात आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी येथे केला.
विदर्भातील १३ धरणांच्या कामात अनागोंदी असल्याचे पुरावे असून अजय संचेती, शक्तीकुमार व एम. संचेती यांनी केलेल्या कामाचे पुरावे सादर करण्यात आल्याचेही दमानिया यांनी पत्रकार बठकीत सांगितले.
ज्या कंपन्यांना पुन्हा-पुन्हा ठेके देण्यात आले, त्याचे भागीदार सारखेच होते. अधिक ठेकेदारांपर्यंत निविदा पोहोचू नयेत, याची काळजी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोपही दमानिया यांनी केला. कोटय़वधीच्या सिंचन घोटाळय़ाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चितळे समितीसमोर पुरावे सादर केल्यानंतर त्या पक्षातील खासदार, आमदारांशी संबंधित पुरावे देण्याची गरज होती. ठेकदार व अधिकाऱ्यांच्या साखळीने भाजपशी संबंधित नेत्यांनी घोटाळे केल्याचा दावा दमानिया यांनी केला. जे प्रकल्प अपूर्ण आहेत, ते आहे त्या स्थितीत थांबविल्यास ४० ते ५० हजार कोटींची बचत होईल, असा दावाही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा