शरद पवार दारिद्रय़रेषेखालील आहेत काय असा सवाल करत ते आता जाणते राजे राहिलेलेच नाहीत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी येथे त्यांच्यावर बोलताना केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना वाई तालुका व सातारा जिल्हा ऊस परिषदेच्या वतीने आयोजित पाचवड (ता. वाई) येथील शेतकरी मेळाव्यात खा. शेट्टी बोलत होते. या वेळी सदाभाऊ खोत उपस्थित होते.
मी देखील शेतकरी आहे. मलाही ऊस गाळपाची घाई झालेली आहे. खा. शेट्टीच्या आंदोलनामुळे जर शेतक ऱ्यांना पाच हजार रुपये भाव मिळाला तर माझीही दिवाळी चांगली जाईल अशी उपाहासात्मक टीका शरद पवार यांनी कोल्हापूर येथे काल केली होती. त्याला या सभेत खा. शेट्टी यांनी उत्तर दिले.
ते पुढे म्हणाले, पवार साहेबांना आता शेतक ऱ्यांचा कळवळा राहिलेला नाही. पवार साहेब आणि शेतक ऱ्यांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे.
खा. शेट्टी म्हणाले, पवार साहेब आता जाणते राजेच राहिलेले नाहीत. त्यांना शेतक ऱ्यांचा कळवळा असता तर त्यांनी कारखान्याच्या संचालकांबरोबर शेतक ऱ्यांची चर्चा घडवून आणली असती. मात्र ते साखर कारखान्यांच्या संचालकांशी चर्चा करत आहेत. माळेगाव, सोमेश्वर आणि भवानीनगर या त्यांच्या जिल्ह्य़ातल्या संचालकांना त्यांनी पोलीस बंदोबस्तात उसाची तोड करून साखर कारखाने चालवायला सांगितले आहे. तुम्ही साखर कारखाने चालवून शेतक ऱ्यांना लुटा असे ते त्यांना सांगत आहेत.
किसन वीर कारखान्यानेही मागील अंतिम बिले व योग्य अ‍ॅडव्हान्स दिल्याशिवाय त्यांना ऊस द्यायचा नाही, असा आदेश शेतक ऱ्यांना देताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही सोडले नाही. मुख्यमंत्री चव्हाण पूर्वी दिल्लीत होते. जे कारखाने काटा मारतात. त्यासाठी काहीतरी करा असे ते मला दिल्लीत सांगत. मी पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. साखर कारखान्यांच्या गेटसमोरच शेतकरी संघटनेला काटा उभारायला पंतप्रधानांनी मला निधी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता हे काटे बसवायला आम्हाला मदत करावी.
गुजरातमधील ११.६७ उतारा असणारा गणदेवी कारखाना जर ३४४७ रुपये दर देत असेल, तर महाराष्ट्रातील त्याच किंवा त्यापेक्षा जास्त उतारा असणाऱ्यांना हा दर का देता येत नाही. माझे आंदोलन शेतक ऱ्यांसाठी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी भाजपा किंवा सेना आणि कोणाचेही व्यवस्थापन असेल, तरी कोणाला भीक घालू नका. हे सरकार दारुडय़ाच्या पैशावर चालते. मागील वर्षी राज्यातील कारखान्यांनी राज्य सरकारला सात हजार २८६ कोटी व केंद्र सरकारला एक हजार २९ कोटी कर रूपाने दिले आहेत. हे पैसे शेतक ऱ्यांनी दिले आहेत.
 तरी सुद्धा राज्य व केंद्र सरकार आणि साखर कारखाने या विषयावर एकवटलेले आहेत. त्यांना शेतक ऱ्यांना पैसेच द्यायचे नाहीत.
आम्ही त्यांना भीक मागत नाही. उधारीत दिलेल्या व त्यांनी रोखीत विकलेल्या साखर व दारूचे पैसे मागत आहोत.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा