‘भट्ट कॅ म्प’मधून बॉलीवूडमध्ये शिरकाव करणाऱ्या ईशा गुप्ताची जोडी जमली होती ती इम्रान हाश्मीबरोबर. आता ईशा इंडस्ट्रीत स्थिरावली असल्याने हाश्मी सोडून इम्रान खानबरोबर तिने जोडी जमवली आहे. पुनीत मल्होत्राच्या आगामी चित्रपटात ईशा गुप्ता आणि इम्रान खान यांच्यावर आयटम साँग चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यातून ईशा म्हणे चित्रपटात इम्रानचा प्रवेश करून देणार आहे. म्हणजे अशी पूर्वी पद्धत होती गाण्यातून नायकाला चित्रपटाची सुरुवात क रून द्यायची. मध्यंतरी ती गायब झाली होती, आता या चित्रपटाने त्याचा शुभारंभ केला जाणार आहे. म्हणजे शुभारंभालाच फसलो म्हणायचे..  मुळात, इम्रान खान आणि ईशा गुप्ता ही जोडी आयटम साँगसाठीसुद्धा का होईना पचनी पडणारी नाही. त्यात चित्रपटाच्या सुरुवातीलाच हे गाणे असणार आहे. यशराज बॅनर निर्मित ‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटात ही जोडी दिसणार असून ईशा फक्त या आयटम साँगपुरती चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाची खरी नायिका आहे करिना कपूर. असो.. या आयटम साँगच्या निमित्ताने ईशाच्या कारकिर्दीत यशराज आणि इम्रान खान या दोन वजनदार नावांचा समावेश होईल. कोण जाणे आयटम साँग हिट झाले तर यशराजच्याच चित्रपटात पूर्ण लांबीची भूमिकाही मिळायची?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा