ऑल इंडिया केमिस्ट्स अॅन्ड ड्रगिस्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य केमिस्ट्स अॅन्ड ड्रगिस्ट्स असोसिएशनच्यावतीने जगन्नाथ शिंदे चषक आंतरराष्ट्रीय गुणांकन बुध्दिबळ स्पर्धा सोलापुरात प्रथमच येत्या ११ ते १५ एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी एक लाख ८० हजारांची १२५ रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
होटगी रस्त्यावर आसरा चौकात किल्लेदार मंगल कार्यालयात सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट्स अॅन्ड्र गिस्ट्स असोसिएशन व श्री रमा जगदीश बहुउद्देशीय महिला उत्कर्ष संस्थेच्या सहयोगाने आयोजित या बुध्दिबळ स्पर्धा महाराष्ट्र चेस असोसिएशन व ऑल इंडिया चेस असोसिएशनच्या मान्यतेने होत आहेत.
या स्पर्धेत खुल्या गटात दोन हजार ते २१ हजारांपर्यंत २१ बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय प्रत्येक गटात ११ बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय वयस्कर खेळाडू व लहान मुला-मुलींसाठी स्वतंत्र बक्षिसे दिली जातील. या स्पर्धेत प्रथम प्रवेश करणाऱ्या १५० खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था मोफत केली जाणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १३०० रुपये असून गुणांकनाप्रमाणे शंभर रुपयांनी हे शुल्क कमी करण्यात आले आहे. सोलापूरच्या खेळाडूंना मात्र केवळ ६५० रुपये प्रवेश शुल्क राहणार आहे. ३१ मार्चपर्यंत प्रवेश शुल्कासह नावनोंदणीसाठी संयोजक शरद नाईक (भ्रमणध्वनी-९४२३३३७३४६) किंवा सुमुख गायकवाड (९४२३२८०२५२) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा