गोदावरी खोरे व जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचा वाटा पिण्यासह शेतीस उपलब्ध झाला पाहिजे, या प्रमुख मागणीसह जायकवाडी प्रकल्पाचे हक्काचे पाणी द्या, अशी घोषणा देत गुरुवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने डॉ. भालचंद्र कानगो यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह व जेलभरो आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी या वेळी हजारावर कार्यकर्त्यांना अटक केली.
जायकवाडी प्रकल्पास गोदावरी खोऱ्यातील हक्काचे पाणी नाकारणे व लोअर दुधना प्रकल्प अपूर्ण असल्याने परभणीतील शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवण्यात येत आहे. गोदावरी नदीवरील कोल्हापुरी बंधारा मुबलक पाणी असताना जलवाहिनीसाठी कर्ज नाकारले जात आहे. याविरोधात भाकपच्या वतीने शनिवार बाजार येथून मोठा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात कानगो यांच्यासह राजन क्षीरसागर, माधुरी क्षीरसागर व विविध संघटनांचे कार्यकत्रे सहभागी झाले होते. मोर्चा शिवाजी चौक, गुजरी बाजार, नारायण चाळ, स्टेशन रोड माग्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे कानगोंसह नेत्यांची भाषणे झाली. नवा मोंढा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना गाडय़ांमधून पोलीस ठाण्यात नेले. जवळपास एक हजार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
जायकवाडीच्या पाण्यासाठी परभणीत भाकपचे जेलभरो
गोदावरी खोरे व जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचा वाटा पिण्यासह शेतीस उपलब्ध झाला पाहिजे, या प्रमुख मागणीसह जायकवाडी प्रकल्पाचे हक्काचे पाणी द्या, अशी घोषणा देत गुरुवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने डॉ. भालचंद्र कानगो यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह व जेलभरो आंदोलन करण्यात आले.
First published on: 04-10-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jailbharo of bhartiya kamunist paksha in parbhani for water of jayakwadi