जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या शेंगेच्या सौद्यात धुळाप्पा बोरगावे (रा.नांदणी) यांच्या शेंगेला ६ हजार ७०० रु पये असा उच्चांकी दर प्राप्त झाला आहे. तंबाखू सौद्यात प्रकाश जयगोंडा पाटील (दानोळी) यांच्या तंबाखूस प्रतिमण १ हजार ८५० रु पये असा उच्चांकी दर देऊन ही तंबाखू येथील तंबाखू व्यापारी विनोद घोडावत यानी खरेदी केली. दीपावली पाडव्याच्या मुहुर्तावर शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेंगेचे सौद्ये काढण्यात आले. सयाजी गायकवाड (जांभळी) यांच्या शेंगेला ६ हजार ५०० रु पये तर तानाजी माने (कुंभोज) यांच्या शेंगेला ६ हजार ४५० रु पये दर मिळाला.
यावेळी झालेल्या लिलावात शेंगेला कमीत कमी दर ३ हजार ८८० रु पये तर जास्तीत जास्त दर ६ हजार ७०० रु पये इतका मिळाला.
 शेंगेच्या सौद्यात एकूण ४७४ पोत्यांचा लिलाव झाला. दि मर्चट्स असोसिएशन सभागृहात झालेल्या लिलावातील शेंग एस.बी.अँड सन्स (यड्रावकर) नांद्रेकर ट्रेिडग, जिनेंद्र पाटील, राजेंद्र मालपाणी, प्रकाश झेले, महावीर ककडे, पणपालिया यांनी खरेदी केली. यावेळी सभापती महावीर पाटील (सकाप्पा) यांनी बाजारपेठेत शेंगेला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी माल बाजारपेठेत विक्रीस आणावा, असे आवाहन केले.
दि मर्चट्स असोसिएशनने सभासदांच्या उपस्थितीत तंबाखू सौद्ये काढण्यात आले. यावेळी लक्ष्मण ज्ञानू पाटील यांच्या तंबाखूस १ हजार ७५० रु पये असा दर मिळाला.
यावेळी ९८ भोद व २ पोती इतकी तंबाखू उच्चांकी दराने विकली गेली. याशिवाय बाजारपेठेत शेंगेस ६ हजार ६०० रु पये तर सोयाबीनला ३ हजार १०० रु पये दर मिळाला.  
संस्थेचे सभासद विनोद घोडावत, प्रमोद चोरडिया, भरत शहा, संजय जोशी यांच्यासह शेतकरी या सौद्यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा