केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणारे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचा जळगाव जिल्हा व महानगर राष्ट्रवादीने निषेध केला असून, जोशी यांनी जळगावमध्ये सभा घेऊन दाखवावी, असे आव्हान दिले आहे.
आकाशवाणी चौकात राष्ट्रवादीतर्फे जोशी यांच्या विरोधात आंदोलनही केले. जोशी हे शेतकऱ्यांच्या नावावर मोठे झाले, मात्र शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीही केले नाही. त्यांची टीका म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक व महानगर अध्यक्ष मनोज चौधरी यांनी केला. जोशी यांना त्यांच्या आरोपात सत्यता वाटत असेल तर त्यांनी जळगावी सभा घेऊन दाखवावी, असे आव्हान राष्ट्रवादीच्या वतीने वाल्मिक पाटील, गणेश सोनवणे, नीलेश पाटील, रमेश पाटील आदींनी दिले आहे.

Story img Loader