तीव्र पाणीटंचाईमुळे ‘मोसंबीचा जिल्हा’ असलेली जालन्याची ओळख संपुष्टात येण्याची शक्यता आहे. घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक मोसंबीच्या बागा असून या तालुक्यात जिल्ह्य़ात सर्वात कमी पाऊस झाला.
माजी आमदार व घनसावंगी तालुक्यातील मूळ गाव असलेले काँग्रेसचे नेते विलासराव खरात यांनी दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर अनेक गावांना भेटी दिल्या. त्यांनी सांगितले की, सरकारच्या विविध योजनांमुळे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात मोसंबी-डाळिंबासह फळपिकांची लागवड केली. सरकारचे अर्थसाह्य़ व स्वत: शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात जिल्ह्य़ात मोसंबी पीक घेतले. जालना जिल्ह्य़ात जवळपास ९० हजार ते १ लाख एकर क्षेत्र मोसंबीखाली असण्याचा अंदाज आहे.
जालना जिल्हा तीव्र पाणीटंचाईने संकटात!
तीव्र पाणीटंचाईमुळे ‘मोसंबीचा जिल्हा’ असलेली जालन्याची ओळख संपुष्टात येण्याची शक्यता आहे. घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक मोसंबीच्या बागा असून या तालुक्यात जिल्ह्य़ात सर्वात कमी पाऊस झाला. माजी आमदार व घनसावंगी तालुक्यातील मूळ गाव असलेले काँग्रेसचे नेते विलासराव खरात यांनी दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर अनेक गावांना भेटी दिल्या.
First published on: 24-01-2013 at 12:40 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalna distrect is water shortage danger situation