जालना नगरपालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींसह स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध पार पडली. उपविभागीय अधिकारी पी. एल. सारेमारे या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. विषय समित्यांच्या सभापतिपदी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी तीन सदस्यांना संधी मिळाली.
नवनिर्वाचित सभापती पुढीलप्रमाणे : शिक्षण- उपनगराध्यक्ष राजेश राऊत (पदसिद्ध), बांधकाम- अतुल इंगळे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण- रेणुका गौरक्षक, वित्त व नियोजन- महावीर ढक्का, स्वच्छता व आरोग्य- विजय पांगारकर, महिला व बालकल्याण-  रिजवाना परवीन शेख अख्तर, स्थायी समितीवर काँग्रेसचे ९, राष्ट्रवादीचे ४, शिवसेनेचे ३ आणि भाजपच्या दोन सदस्यांची नावे त्या पक्षाच्या गटनेत्यांकडून यावयाची होती. परंतु शिवसेनेकडून तीन नावे आली नाहीत म्हणून उर्वरित १५ सदस्यांची नावे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केली.
भोकरदन आणि अंबड नगरपालिकेतही विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध झाली.
भोकरदन नगरपालिका: शब्बीरखाँ पठाण कुरेशी (बांधकाम), राजाभाऊ देशमुख (नियोजन), रेखाताई दारुंटे (महिला व बालविकास), कमलबाई तळेकर (आरोग्य व स्वच्छता), शफीकखाँ पठाण (पाणीपुरवठा व जलनि:स्सारण) अंबड नगरपालिकेतील विविध विषय समित्यांच्या सभापतिपदी कैलास भोरे, संतोष सोमाणी, वैशाली सावंत, वैशाली राऊत, नारायण कटारे यांची बिनविरोध निवड झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा