जामखेड तालुक्यातील कुख्यात गुंड परवेज अजहर सय्यद (राहणार बीड रोड, जामखेड) यास दोन वर्षांसाठी नगर, सोलापूर, बीड व उस्मानाबाद या चार जिल्हय़ांमधून तडीपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी संदीप कोकडे यांनी ही माहिती दिली.
जामखेड शहर व परिसरात गेल्या तीन वर्षांपासून परवेज सय्यद विविध गुन्हय़ांमध्ये सहभागी होता. हा अटक करून समज दिल्यानंतरही त्याच्यात कोणतीच सुधारणा झाली नाही. त्याची वाढती दहशत लक्षात घेऊन त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. जामखेड शहरात त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यासही कोणी पुढे येत नव्हते. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यास दोन वर्षांसाठी नगरसह शेजारच्या सोलापूर, बीड व उस्मानाबाद या चार जिल्हय़ांमधून हद्दपार करण्यात आले आहे. जामखेड शहरात या कारवाईचे स्वागत होत आहे.

Story img Loader