येत्या जानेवारीमध्ये मुदत संपणाऱ्या केज तालुक्यातील जानेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. कौडगाव, घाटेवाडी व नाटेवाडी येथील ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होणार असल्याची माहिती तहसीलदार शरद झाडके यांनी दिली.
जानेगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ जानेवारी पूर्ण होत आहे. या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली. या ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. घाटेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य मयत झाल्याने तेथे एका जागेसाठी पोटनिवडणूक होईल. कौडगाव येथील दोन सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे येथे दोन जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. नारेवाडीतही दोन ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिल्याने येथेही दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. राखीव प्रवर्गातून निवडणूका लढवू इच्छित असणाऱ्या उमेदवारांनी जातपडताळणीचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार शरद झाडके यांनी केले.
केजमधील जानेगावसह तीन गावांची निवडणूक
येत्या जानेवारीमध्ये मुदत संपणाऱ्या केज तालुक्यातील जानेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. कौडगाव, घाटेवाडी व नाटेवाडी येथील ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होणार असल्याची माहिती तहसीलदार शरद झाडके यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-11-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janegaon election declair