झेंडा, मोरया या चित्रपटांच्या यशानंतर गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचा ‘जय महाराष्ट्र ढाबा भिठडा’चे प्रदर्शन व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधून १४ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे.
कोल्हापूरचा सयाजी िनबाळकर आणि पंजाबची जसिवदर कौर यांची प्रेमकथा मांडणाऱ्या या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पंजाबमध्ये करण्यात आले आहे. संगीत नीलेश मोहरीर यांनी दिले आहे.
 या प्रमुख भूमिकेत अभिजित खांडके व प्रार्थना बेहरे असे दोन नवे चेहरे दाखल होत आहेत. याशिवाय विक्रम गोखले, पुनित इस्सार, शुभांगी लाटकर, मोनिका डबडे, प्रियदर्शन जाधव, गणेश मयेकर, सबरीत कौर, वरु ण यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader