लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी उमेदवारांची यादी जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात जाहीर केली जाणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हातकणंगले मतदार संघातून ज्येष्ठ कार्यकत्रे म्हणून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना मैदानात उतरविण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसशी राष्ट्रवादीची आघाडी राहणार असून २२-२६ हे सूत्र जागा वाटपासाठी कायम राहील. राष्ट्रवादीच्या वाटय़ाला येणाऱ्या मतदार संघात ताकदीचे उमेदवार पक्षाकडे असून काही दिग्गज कार्यकत्रे राज्यातून केंद्रात जावेत, अशी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भूमिका आहे. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळातील काही सदस्यांना लोकसभा निवडणुकीच्या िरगणात उतरावे लागेल. हातकणंगले मतदार संघातून गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांचा पराभव झाला. हा पराभव मित्रपक्षाने दगाबाजी केल्यानेच झाला असल्याचा राष्ट्रवादीचा दावा असून या वेळी कोणत्याही स्थितीत हातकणंगलेची जागा पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी जयंत पाटील हे सुद्धा उमेदवार असू शकतील. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार घेणार आहेत.
दरम्यान, कार्यकर्त्यांच्या बठकीत बोलताना जाधव म्हणाले की, ऊस दर आंदोलनात शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या राजू शेट्टी यांना शेतकरीच घरचा रस्ता दाखवतील. शिवसेना, भाजप, मनसे हे पक्ष राष्ट्रवादीवर टीका करतात. त्याचबरोबर मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसनेही टीका करावे हे मत्रीच्या नात्याला अडचणीत आणण्यासारखेच आहे. केलेल्या कामाचे श्रेय देण्यात काँग्रेसला कमीपणाचे वाटते. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शासन स्तरावरुन घेतलेल्या निर्णयाचे मार्केटिंग करीत राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करावा.
ते पुढे म्हणाले की, सांगली मतदार संघ काँग्रेसकडे आहे. जिल्ह्य़ातील बहुसंख्य स्थानिक संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्या तरी, काँग्रेसच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे कार्यकत्रे प्रयत्नशील राहतील. हातकणंगले येथेसुद्धा काँग्रेसने राष्ट्रवादीला मनापासून सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.
कार्यकर्त्यांच्या बठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज पाटील, आ. मानसिंगराव नाईक, अजित घोरपडे, दिनकर पाटील, संजय पाटील, पृथ्वीराज देशमुख, अरुण लाड, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात
हातकणंगले मतदार संघातून ज्येष्ठ कार्यकत्रे म्हणून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना मैदानात उतरविण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले.
First published on: 29-12-2013 at 02:25 IST
TOPICSजयंत पाटीलJayant Patilभास्कर जाधवBhaskar Jadhavराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPसंसदीय निवडणुकाParliament Election
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil ncp parliament election bhaskar jadhav