नागपूरची गर्दी व दीर्घ प्रतीक्षा यादी लक्षात घेऊन जयपूर ते सिकंदराबाद आणि सिकंदराबाद ते जयपूर मार्गावर धावणाऱ्या दोन रेल्वेगाडय़ा डिसेंबर महिन्यात नागपूर स्थानकाकडे वळवण्यात आल्या आहेत.
जयपूर ते सिकंदराबाद आणि सिकंदराबाद ते जयपूरच्या दरम्यान धावणाऱ्या दोन गाडय़ांच्या एकूण १० साप्ताहिक फेऱ्या नागपूर स्थानकावरून होतील. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी व प्रतिक्षा यादी लक्षात घेऊन ०९७३६ आणि ०९७३५ या क्रमांकाच्या जयपूर ते सिकंदराबाद व सिकंदराबाद ते जयपूरला जाणाऱ्या गाडय़ा नागपूर, बल्लारशाह या स्थानकावरून सप्ताहमधून १० फेऱ्या करतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्यावतीने देण्यात आली आहे. जयपूर ते सिकंदराबाद मार्गावरील ०९७३६ क्रमांकाची विशेष गाडी जयपूरहून डिसेंबरमधील प्रत्येक शनिवारी एक, आठ, १५, २२ आणि २९ तारखांना ९.१० वाजता प्रस्थान करेल आणि सोमवारी ३.५५ वाजता सिकंदराबादला पोहोचेल. ही गाडी दोन ते ३० डिसेंबरच्या दरम्यान प्रत्येक रविवारी नागपूरहून जातील. नागपूरला या गाडीचे आगमन दुपारी ४.४० वाजता होईल. दहा मिनिटे गाडी नागपूरच्या मुख्य स्थानकावर थांबेल. त्यानंतर ४.५० वाजता प्रस्थान करेल. त्यानंतर रात्री ७.४०ला ती बल्लारशाहला पोहोचेल. तेथून आठ वाजता ती गाडी सुटेल.  गाडी क्रमांक ०९७३५ ही सिकंदराबाद ते जयपूर या मार्गावर धावणारी रेल्वे डिसेंबर महिन्यातील प्रत्येक सोमवारी म्हणजे तीन, १०, १७, २४ आणि ३१ या तारखांना  सिंकदराबादहून ११.२५ प्रस्थान करेल. ती जयपूरला बुधवारी सकाळी ६.१५ वाजता पोहोचेल. ही विशेष गाडी चार डिसेंबर २०१२ ते एक जानेवारी २०१३ पर्यंत प्रत्येक मंगळवारी बल्लारशाह येथे सकाळी ६ वाजता पोहोचेल आणि ६.१० वाजता तेथून प्रस्थान करून नागपुरात सकाळी १०.२० वाजता पोहोचेल. दहा मिनिटे थांबून १०.३० वाजता प्रस्थान करेल.
या दोन्ही विशेष गाडय़ा दुर्गापूर, भनस्थली निवाई, सवाई माधोपूर, कोटा जंक्शन, नागदा जंक्शन, उज्जन, शुजालपूर, सिहोर, भोपाळ, इटारसी, नागपूर, बल्लारशाह, सिरपूर, कागजनगर, बेलमपल्ली, मन्चीरियाल, रामागुण्डम आणि काजीपेठ स्थानकावर थांबतील. या गाडय़ांमध्ये एकूण २० कोचेस असतील. ज्यात एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, चार वातानुकूलित तृतीय श्रेणी यान, १० स्लीपर क्लास, दोन साधारण द्वितीय श्रेणी आणि दोन एसएलआर कोच राहतील. प्रवाशांनी या रेल्वे गाडय़ांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader