लातूर लोकसभा मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, या साठी आपण या मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे खासदार जयवंत आवळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पाच वर्षांपूर्वी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या आग्रहाखातर आपण लातुरातून निवडणूक लढवली. निवडून आल्यानंतर प्रामाणिकपणे मतदारसंघात कामे केली. लोकसभेत मतदारसंघाचे अनेक प्रश्न उपस्थित केले. शंभर टक्के उपस्थिती ठेवली. लातूरकरांना गालबोट लागेल, असे काम केले नाही. या वेळी स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आपण विद्यमान खासदार असतानाही व पुन्हा उमेदवारी मिळण्याचा शंभर टक्के विश्वास असतानाही स्वतहून लातूरमधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपण आपला निर्णय पूर्वीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळविला आहे. लातूरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आपण आभारी असल्याचे आवळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
लातुरातील स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना आठवडाभरापूर्वी भेटून स्थानिक कार्यकर्त्यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, असे निवेदन दिले होते. या पाश्र्वभूमीवर आवळे यांनी पत्रकात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा