महिला बचत गटाची स्थापना व व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय पद्धतीने करून स्वत:च्या उत्पादनासाठी एक ब्रँडनेम तयार करणाऱ्या जिजाऊ मार्केटिंगचे कार्य खरोखरीच कौतुकास पात्र आहे, असे प्रतिपादन येथील एमईटी संस्थेच्या विश्वस्त शेफाली भुजबळ यांनी केले.
नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था व जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या वतीने ‘जिजाऊ मार्केटिंग’ या खास बचत गटांसाठी उभारलेल्या दिवाळी बाजाराचे प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे उद्घाटन शेफाली भुजबळ यांच्या हस्ते गोविंदनगर येथील विघ्नहर्ता उद्यानाशेजारी झाले. 
या प्रसंगी महापालिका आयुक्त संजय खंदारे, जिल्हा उपनिबंधक बाजीराव शिंदे, अ‍ॅड. रवींद्र पगार, नाना महाले, सोफिन मेनन आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांनी उपक्रमांची माहिती व बचत गटाच्या सत्कार सोहळ्याची भूमिका मांडली. आयुक्त खंदारे यांनी बचत गटाच्या या चळवळीत नाशिक मनपा सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.
बाजीराव शिंदे यांनी सहकार खात्याकडून बचत गटाला कमी व्याजदरात अर्थसहाय्य करण्याविषयी व सहकार प्रशिक्षण केंद्राद्वारे गुणात्मक प्रशिक्षण देण्यासाठी सूचना निश्चितपणाने करू, असे सांगितले. अ‍ॅड. पगार, नाना महाले यांनीही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात अनुक्रमे दुसऱ्या मूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या अन्नपूर्णा, जयहिंद, मयूरेश, चेतना, मल्हारबाबा, अंजली, सुरभी, अंजलीसूत हे बचत गट तसेच ब वर्ग श्रेणीतील बचत गट श्लोक, स्नेहवर्धिनी, श्रीसिद्धी, विनायक, अन्नपूर्णा जयश्रीराम, रेणुका, एकदंत, गायत्री देवी, गौतमी, माता गौतमी या बचत गटांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. दिवाळीचे फराळ व आणखी काही वैशिष्टय़पूर्ण उत्पादने या प्रदर्शनास असून त्यांचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. सूत्रसंचालन आशा पाटील यांनी केले.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
Story img Loader