जेएनपीटी कामगार विश्वस्त निवडणुकीची तारीख निश्चित करण्यासाठी केंद्रीय कामगार उपआयुक्तांनी बोलविलेल्या कामगार संघटनांच्या बैठकीत जेएनपीटीमध्ये नव्याने स्थापन झालेल्या रवी पाटील यांच्या वर्कर्स युनियनला निमंत्रित न केल्याने त्यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे  मंडळाची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जेएनपीटी बंदराचे कामकाज पाहण्यासाठी पोर्ट ट्रस्ट कायद्यानुसार १९ सदस्य असलेले विश्वस्त मंडळ आहे. या मंडळात बंदराशी संलग्न असलेली विविध आस्थापने तसेच केंद्र व राज्य सरकारचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे जेएनपीटी कामगारांतून दोन विश्वस्तांचीही नेमणूक केली जाते. यामध्ये गेली सोळा वष्रे भूषण पाटील तर सहा वर्षांपासून दिनेश पाटील हे जेएनपीटी कामगारांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या दोन्ही कामगार विश्वस्तांची मुदत ३१ मार्च २०१३ रोजीच संपुष्टात आली आहे. त्यामुळे जेएनपीटी विश्वस्त मंडळाच्या कामगार विश्वस्तपदाच्या दोन जागांसाठी निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. निवडणुकीची तारीख निश्चित करण्यासाठी केंद्रीय कामगार उपआयुक्तांनी कामगार संघटनांची बठक बोलाविली होती. मात्र रवी पाटील यांच्या वर्कर्स युनियनला निमंत्रित न केल्याने त्यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे पुढील कारवाईसाठी उपायुक्तांनी दिल्ली येथे मुख्य कामगार आयुक्तांकडे या हरकती पाठविल्या आहेत. त्यामुळे मंडळाची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणुकीत जेएनपीटी एकता कामगार संघटना, न्हावा-शेवा बंदर कामगार संघटना(अंतर्गत), न्हावा-शेवा पोर्ट अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियन, ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स युनियन यांच्यात पारंपरिक लढत होत आली आहे.
मात्र नव्याने स्थापन झालेल्या कामगार संघटनेनेही दावा केला असल्याने या वर्षीची कामगार विश्वस्तांची निवडणूक चुरशीची होती.  निवडणुकीत सहभाग घेण्यासाठी निमंत्रित करण्यात न आल्याने कामगार आयुक्तांकडे नवीन युनियनने हरकत नोंदविली आहे. तसेच गुप्त मतदानाला ज्येष्ठ कामगार नेते एस. आर. कुलकर्णी यांचा विरोध असल्याने दहा महिन्यांपासून निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. पुन्हा एकदा हरकतीचा मुद्दा आल्याने कामगार विश्वस्तांच्या निवडणुका होणार का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा