आपल्या तडाखेबंद लेखणीद्वारे अभिजात व्यंगचित्र कलेद्वारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकारितेचे क्षेत्र समृध्द केले असून, त्यांच्या या कार्यातून भावी पिढय़ांना सदैव प्रेरणा मिळत राहील. अशा शब्दात सातारा पत्रकार संघातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहिली.
सातारा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात संघाचे अध्यक्ष विजय मांडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनीच शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव मांडला. त्यानंतर सर्वानी दोन मिनिटे स्तब्धता पाळली. शिवसेनाप्रमुखांचे सडेतोड अग्रलेख आणि व्यंगचित्रे ही वृत्तसृष्टीला मिळालेली अपूर्व देणगी असून, त्यांचे हे योगदान कोणीही विसरू शकत नाही, अशा भावना यावेळी अध्यक्ष मांडके, उपाध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आदींनी व्यक्त केल्या. यावेळी संघाचे सचिव प्रवीण जाधव, खजिनदार दीपक प्रभावळकर, कार्यकारिणी सदस्य गजानन चेणगे, श्रीनिवास डोंगरे, प्रगती जाधव, राहुल तपासे, बाळकृष्ण कदम, पांडुरग पवार, सचिन धुमाळ, नरेंद्र जाधव उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पत्रकारांच्या वतीने कराडच्या शासकीय विश्रामगृहात शोकसभेने श्रद्धांजली वाहण्यात आली. ठाकरे यांनी दैनिक सामना व मार्मिक साप्ताहिकातून निर्भीड पत्रकारितेचा आदर्श घालून दिला. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त केली. विविध वृत्तपत्रांचे व दूरचित्रवाणी वाहिन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा