मोबाइल टॉवरच्या माध्यमातून येणाऱ्या किरणांचा प्रभाव कमी व्हावा याबाबत सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगत अभिनेत्री जुही चावला हिने मोबाइल किरणांच्या विरोधातील मोहिमेत उडी घेतली आहे. मोबाइलच्या किरणांमुळे मानवी जीवनावर विपरीत परीणाम होत असून हे टाळण्यासाठी मोबाइलचा वापर मर्यादित झाला पाहीजेच इतकेच नव्हे तर या मोबाइल टॉवरमधून येणारी किरणे कमी दाबाने गेली पाहीजे असे जुहीने एका कार्यक्रमा स्पष्ट केले.
लहान मुलांना आपण कौतुकाने मोबाइल हाताळण्यास देतो. मात्र यामुळे त्यांच्या नाजूक हाडांवर विपरीत परीणाम होत असतो. याची जाण आपल्याला नसते. मोबाइलच्या टॉवरच्या माध्यमातून येणारी किरणे ही अधिक हानीकारक असून त्यापासून मोठय़ांनाही त्रास होत असतो. यामुळे यावर र्निबध येणे गरजेचे असल्याचे येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात जुहीने स्पष्ट केले. यावेळी मोबाइलच्या किरणांवर अभ्यास करणारे आयआयटी मुंबईतील प्राध्यापक डॉ. गिरीश कुमार, डॉ. गोखानी, अनुज जैन, प्रकाश मुन्शी आदी तज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी डॉ. गिरीश कुमार यांनी मोबाइल किरणांच्या संदर्भातील अनेक दुष्परिणामांची जाणीव करून देत ही गोष्ट आवश्यक असली तरी त्याचा वापर कमीत कमी करून हे कसे टाळता येऊ शकते हे पटवून दिले. याचबरोबर मोबाइल कंपन्यांनी किरणे सोडण्याचे प्रमाण कशाप्रकारे कमी करणे आवश्यक आहे हेही यावेळी त्यांनी पटवून दिले. या संदर्भात अधिकाधिक जनजागृती होणे गरजेचे असून सरकारनेही यावरील र्निबधांवर सखोल विचार करणे गरजेचे असल्याचे डॉ. गिरीश कुमार यांनी स्पष्ट केले.

Story img Loader