कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘सरकार जगाओ’ आंदोलन सुरु करण्यात आले
असून त्यानुसार आज महासंघाच्या नगर शाखेने आज तहसील कार्यालयासमोर धरणे धरुन निदर्शने केले. मागण्या मान्य न झाल्यास बारावी परिक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, सरचिटणीस सोपानराव कदम, किरण इंगळे, सुदाम बोरुडे, महादेव थोरात, बी. एन जाधव, श्रीमती ए. एस. देसाई, आर. बी. लंके, श्रीमती एस. व्ही. गुंजाळ, दिलीप भिसे, कैलास गोरे, अर्जुन कांबळे, एस. बी. भोंडवे, बी. एन. शेळके, एस. एस. मुरुमकर आदंींनी आंदोलनात भाग घेतला.
शिक्षकांना सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी १ जानेवारी १९९६ पासून लागू करावी, तुकडी टिकवण्यासाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी, कायम विनाअनुदानित तत्व रद्द करावे, केंद्र सरकारप्रमाणे सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी व ग्रेड पे देण्यात यावे, सन २००५ ते २००७ पर्यंत वगळलेली पदे व सन २००८ ते २०१२ पर्यंतच्या प्रस्तावित पदांना मान्यता द्यावी, माध्यमिकप्रमाणे विनाअनुदानित काळातील सेवा वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी ग्राह्य़ धरावी आदी मागण्यांसाठी आंदोलन असल्याचे विधाते यांनी सांगितले.

Story img Loader