अपात्र उमेदवारांची परीक्षा घेतल्यानंतर त्यांच्याकडून लेखी स्वरूपात ते पात्र नसल्याचे लिहून घेण्यात आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने कनिष्ठ यांत्रिक पदाची भरती प्रक्रिया अखेर रद्द केली.
रविवारी या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. त्यास ७ उमेदवार हजर होते. मात्र, आलेल्या उमेदवारांकडे अनुभव प्रमाणपत्र नसतानाही परीक्षा घेण्यात आली. ज्या अपात्र विद्यार्थ्यांकडून पात्रतेविषयी लिहून घेण्यात आले, ते गुरुवारी चांगलेच संतापले होते. या पदासाठी ५ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक होता. ते प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांची परीक्षा घेतल्याने भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली.
कनिष्ठ यांत्रिक पदाची भरती प्रक्रिया अखेर रद्द
अपात्र उमेदवारांची परीक्षा घेतल्यानंतर त्यांच्याकडून लेखी स्वरूपात ते पात्र नसल्याचे लिहून घेण्यात आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने कनिष्ठ यांत्रिक पदाची भरती प्रक्रिया अखेर रद्द केली.
First published on: 07-06-2013 at 01:35 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Junior mechanics recruitment process cancelled