महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य केवळ माळी समाजापुरते मर्यादित नाही. सर्वच समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले, हेच त्यांचे विचार आज रुजवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. हरि नरके यांनी केले.
महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने फुले यांच्या जयंतीनिमित्त काल प्रा. नरके यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते. समितीच्या वतीने काढली जाणारी मिरवणूक यंदा जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीमुळे रद्द करून त्याऐवजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
समाजहितासाठी विशेषत: विधवा व महिलांना न्याय मिळवून देण्याचे फुले दाम्पत्याचे कार्य महानच आहे, हा इतिहास शब्दांत मांडणे कठीण आहे, परंतु समाज त्यांचे विचार विसरत चालला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या वेळी प्रा. नरके यांनी फुले दाम्पत्याचे कार्य विशद केले. अ‍ॅड. अभय आगरकर यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आभार मानले. भगवान फुलसौंदर, किशोर डागवाले, धनंजय जाधव, अंबादास गारुडकर, संभाजी कदम, दत्ता जाधव, जालिंदर बोरुडे, कैलास गिरवले, दत्ता कावरे आदी उपस्थित होते.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा