प्रियदर्शनी सेवा संस्थेच्या वतीने कळमनुरी येथे ५ ते ११ जानेवारी दरम्यान कळमनुरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. शंकरराव सातव महाविद्यालयात शनिवारी चित्रपट अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर सारेगमप लिटल चॅम्प प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. रविवारी व सोमवारी विविधगुणदर्शनामध्ये गीत-संगीत व नृत्याविष्काराची पर्वणी आहे. मंगळवारी मिर्झा एक्स्प्रेस, बुधवारी उदय साटम व संचाचा ‘मायमराठी’ हा विविध लोककला, नृत्याविष्कारांचा बहुरंगी कार्यक्रम, गुरुवारी दीप्ती आहेर प्रस्तुत ‘लाखात देखणी’ हा लावणीनृत्यांचा, तर ११ जानेवारीला पारितोषिक वितरणानंतर निकिता मोघे व त्यांचा संच ‘महाराष्ट्राची लोकधारा’ सादर करणार आहेत. महोत्सवात महिलांसाठी विविध स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत.
आणखी वाचा