कालिदास महोत्सव मार्च महिन्यात रामटेक व नागपुरात होणार असल्याचे रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल यांनी सांगितल्याने हा महोत्सव होणार की नाही, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
 नियोजित वेळ निघून गेल्याने हा महोत्सव होणार की नाही असे वाटत होते. या महोत्सवासाठी लागणाऱ्या निधीत शासनाकडून वाढ करून द्यावी, यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी हिवाळी अधिवेशनात संबंधित सचिवांशी भेट घेऊन चर्चाही केली होती. आमदार आशीष जयस्वाल यांनी आग्रहदेखील केला होता. तसे प्रयत्नही सुरू केले
होते.
आता कालिदास महोत्सवाला मुहूर्त सापडला असून तो ९ व १० मार्चला रामटेकला होणार आहे. त्यानंतर १६ व १७ मार्चला नागपुरात आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी आमदार निधीतूनही निधी देणार असल्याचे जयस्वाल म्हणाले. महोत्सवासाठी निधी अपुरा पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

Story img Loader