भिंतीवर असणाऱ्या ‘कालनिर्णय’ या दिनदर्शिकेने आता काळाची गरज लक्षात घेऊन आपल्या दिनदर्शिकेचे अ‍ॅप आता अ‍ॅण्ड्रॉइड व अ‍ॅपल मोबाइलधारकांसाठी बाजारात आणले आहे आणि ते पूर्णपणे विनामूल्य आहे. याच्या डाऊनलोडसाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार नाहीत. विशेष म्हणजे ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’ या उक्तीप्रमाणे जसेच्या तसे कालनिर्णयचे अ‍ॅप ‘जी- ५ वेब’ या कंपनीचे तुषार भगत यांच्या सहकार्याने आणि ‘ओरा ज्युवेलरी’च्या सहयोगाने बाजारात आणण्यात आले आहे, अशी माहिती कालनिर्णयचे संचालक जयेंद्र साळगांवकर यांनी दिली आहे. म्हणजे भिंतीवर असणारा कालनिर्णय आता ‘मोबाइलमध्येही कालनिर्णय असावे,’ असे म्हणणार आहे. या अ‍ॅपचे वैशिष्टय़ म्हणजे तुम्ही यामध्ये आवश्यक माहिती लिहू शकता. सणसुदीचे दिवस, वाढदिवस व इतर महत्त्वाचे दिवस तुम्ही नोंद करू शकता. अमुक एक दिवस महत्त्वाचा वाटला तर तो आठवणीत राहण्यासाठी त्याला एका संदेशाद्वारे तुम्ही नोंद करू शकता म्हणजेच रिमाइंडर्स लावू शकता आणि इतर बरेच काही सुविधा देण्यात अ‍ॅण्ड्रॉइड व अ‍ॅपल मोबाइलधारकांसाठी देण्यात आल्या आहेत. सध्या मराठी, इंग्रजी तसेच गुजराती या भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी http://www.kalnirnay.com/android किंवा http://www.kalnirnay.com/iphone   या लिंकवर क्लिक करा आणि सर्चमध्ये kalnirnay २०१४असे टाकलेत की तुम्हाला या मोफत सुविधेचा लाभ उठवता येईल, असे जयेंद्र साळगांवकर यांनी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा