कल्याण-डोंबिवली पालिकेतील शिवसेना नगरसेवकांच्या अस्वस्थतेने टोक गाठले असून महापौर निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे राजीनामे देण्याची तयारी दोघा नगरसेवकांनी केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या नगरसेवकांनी याविषयी उघडपणे बोलण्यास नकार दिला असला तरी आपला निर्णय ठाम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
ठाण्याप्रमाणे कल्याण-डोंबिवलीतही शिवसेनेत गटबाजीला अक्षरश ऊत आला आहे. या गटबाजीमुळे फुटीची चिन्हे दिसू लागली असून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी करून दखल घेतली जात नसल्याने हे नगरसेवक फुटण्याचे बेत आखू लागले आहेत. शिवसेनेच्या जिल्हास्तरावरील नेते तसेच महापालिकेतील महापौर तसेच इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून फारसे सहकार्य मिळत नसल्याने पक्षाचे काही नगरसेवक अस्वस्थ आहेत. त्यामुळे आपण राजीनामा देण्याच्या तयारीत आहोत, असे या नगरसेवकांनी सांगितले. एप्रिलअखेर महापौरपदाची निवडणूक होत आहे. शिवसेनेचे सभागृहात एकूण ३८ संख्याबळ आहे. शिवसेना-भाजपचे संख्याबळ पाहता सभागृहात युतीचे सध्या ४७ नगरसेवक आहेत. याशिवाय मनसेचे २८, काँग्रेस आघाडीचे ३२ नगरसेवक सभागृहात आहेत. मनसे व आघाडीने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेतील खदखद वाढल्याने महापौर निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा