प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी-कुर्ला) ते आसाममधील कामाख्या या मार्गावर चालू आठवडय़ात एक विशेष गाडी धावणार आहे.
०५६१२ कामाख्या – कुर्ला ही गाडी शनिवार २ मार्च रोजी कामाख्या स्थानकावरून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी, सोमवारी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी नागपूरला येऊन दहा मिनिटांनी पुढे रवाना होईल. त्याच रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी ती कुर्ला येथे पोहचेल.
०५६११ कुर्ला- कामाख्या ही गाडी बुधवारी, ६ मार्च रोजी एलटीटी स्थानकावरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी, गुरुवारी मध्यरात्री १ वाजून २५ मिनिटांनी नागपूरला येईल व १.३५ वाजता पुढे रवाना होईल.
ही गाडी तिसऱ्या दिवशी, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी कामाख्या येथे पोहचेल. या गाडीला एसी टू टियर व एसी थ्री टियरचा प्रत्येकी एक, शयनयान श्रेणीचे १०, सामान्य अनारक्षित श्रेणीचे ४ व दोन एसएलआर असे एकूण १८ डबे राहणार असून प्रवाशांनी या विशेष गाडीचा लाभ घ्यावा, असे रेल्वेने कळवले आहे.
दरम्यान, १२९९३/ १२९९४ गांधीधाम- पुरी- गांधीधाम एक्सप्रेसला ओरिसाच्या संबलपूर विभागातील बरगड रोड रेल्वे स्थानकावर ३ मार्चपासून सहा महिन्यांकरता प्रायोगिक तत्वावर दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे.