प्रसिध्द साहित्यिक विश्वास पाटील यांच्या ‘रज्जो’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री कंगना राणावत मुख्य भूमिकेत आहे. कंगनाला यात मुजरेवालीची भूमिका साकारायची होती. याआधी कंगनाने अशी भूमिका केली नव्हती त्यामुळे रज्जो साकारण्यासाठी तिला फार मेहनत घ्यावी लागली. यासाठी चित्रिकरणाच्या वेळा सांभाळून मिळेल त्या वेळेत कंगनाने रेडलाईट परिसराची भ्रमंती केली.
कोठी म्हणजे काय? मुजरेवाली कशी असते?, अशा सगळ्याच गोष्टी जाणून घेतल्याशिवाय रज्जो साकारणे कठिण होते. त्यामुळे कुठलीही कुरकुर न करता कं गनाने प्रत्यक्ष त्या त्या परिसरात जाऊन स्वत: माहिती घेतली आणि त्याचा वापर रज्जो साकारण्यासाठी केला.
एक अभिनेत्री म्हणून ग्लॅमरच्या जगात वावरणाऱ्या कं गनाला खुल्लमखुल्ला रेडलाईट परिसरात फिरणे शक्य नव्हते. त्यामुळे कधी रात्री उशिरा, कधी भल्या पहाटे नाहीतर कधी बुरखा घालून ती या परिसरात फिरली. लोकांनी आपल्याला ओळखू नये म्हणून नेहमीच काहीतरी वेगळे रूप घेऊन तिला फिरावे लागले. पण, या फिरण्यातून आणि निरीक्षणातूनच रज्जो उत्तमरित्या साकारता आली, असे कंगनाचे म्हणणे आहे. ‘रज्जो’ हा चित्रपट आणि त्यातली भूमिका कंगनासाठी फार महत्त्वाची असून आपण चांगले काम केले आहे, असा विश्वासही कंगनाला वाटतो आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरला दीपिकाच्या ‘रामलीला’ बरोबर ‘रज्जो’ प्रदर्शित करण्याचा धाडसी निर्णय तिने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा