एका श्वासात गायिलेले गीत आणि त्यापूर्वीचे एकाच दमातील कवितेचे अभिवाचन अशा ब्रेथलेस गीताचा समावेश असलेला ‘कण्हेरीची फुले’ हा अल्बम सोमवारी रसिकांसाठी खुला झाला. बेला शेंडे या गायिकेचा स्वर आणि अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांचा आवाज हा मिलाफ यानिमित्ताने जुळून आला आहे.
गावाकडच्या आठवणींचा गहिवर या अल्बममधील कवितांतून प्रकटला आहे. शंकर जांभळकर आणि प्राजक्ता गव्हाणे यांच्या गीतांसाठी तेजस चव्हाण या युवा संगीतकाराने स्वररचना केल्या आहेत. या अल्बमसाठी सुरेश वाडकर आणि प्रसन्नजित कोसंबी यांनी गीते गायिली आहेत. एरवी नदीच्या कडेला किंवा पुलाच्या दुभाजकावर आढळणारी कण्हेरीची फुले रसिकांच्या घरामध्ये जावीत हा उद्देश असल्याचे या अल्बमच्या दिग्दर्शक प्राजक्ता गव्हाणे आणि निर्माता शंकर जांभळकर यांनी सांगितले. बेला शेंडे म्हणाली, या गाण्यामध्ये शब्दांची मांडणी चांगली आहे. दोन मिनिटे आणि ५७ सेकंदांचे गाणे सात तासांमध्ये ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. गीत आणि अभिवाचन असे सहाशे शब्दांचे ब्रेथलेस याची नोंद लिम्का बुकमध्ये झाली आहे. या अल्बमचा मी एक भाग असल्याचा आनंद आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा