विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. वि. दा. कराड,  निखील वागळे यांच्यासह १९ जणांना दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. येत्या २५ नोव्हेंबर रोजी सोलापुरात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष डी. ए. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
पुरस्कार, पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे व स्वरूप याप्रमाणे: एमआयटीचे डॉ. विश्वनाथ कराड, पुणे (कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणसेवा पुरस्कार, ११ हजार रोख, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ), ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे, मुंबई (वा. रा. कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार, रोख ११ हजार, सन्मानपत्र), धन्यकुमार जैनी, सोलापूर (आचार्य विद्यानंद मराठी साहित्य पुरस्कार रोख पाच हजार व सन्मानपत्र), जिवंधर होतपेटी, हुबळी (आचार्य बाहुबली कन्नड साहित्य पुरस्कार, रोख पाच हजार, सन्मानपत्र), डॉ. कुलभूषण लोखंडे, सोलापूर (आचार्य कुंदकुंद प्राकृत ग्रंथ संशोधन व लेखन पुरस्कार, रोख पाच हजार, सन्मानपत्र), बाळप्पा सांगले, नसलापूर (आचार्य सुबलसागरजी महाराज त्यागीसेवा श्रावक पुरस्कार, रोख पाच हजार व सन्मानपत्र), स्नेहलता कांतिलाल दोशी, अकलूज (धन्नाबाई गंगवाल त्यागी सेवा महिला पुरस्कार, रोख अडीच हजार व सन्मानपत्र), जयप्रकाश दगडे, लातूर (प्राचार्य जी. के. पाटील आदर्श पत्रकारिता पुरस्कार, रोख पाच हजार व सन्मानपत्र), भाऊसाहेब आदगोंडा पाटील, आळते-कोल्हापूर (वीराचार्य बाबासाहेब कचनुरे आदर्श युवा पुरस्कार, रोख पाच हजार व सन्मानपत्र), जे. बी. पाटील, औरंगाबाद (डॉ. एन. जे. पाटील आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, रोख पाच हजार रोख व सन्मानपत्र), वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था, सांगली (अरिहंत सौहार्द क्रेडिट सहकारी आदर्श संस्था पुरस्कार, १० हजार रोख व सन्मानपत्र), शैलजा अजित निटवे, जयसिंगपूर (प्रा.डी. ए. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार, पाच हजार रोख व सन्मानपत्र), लक्ष्मीबाई बाबू शिरगावे, गणेशवाडी-कोल्हापूर (प्रेमाताई जैन आदर्शमाता पुरस्कार, रोख दोन हजार व सन्मानपत्र), पवनकुमार हिराचंद जमगे, शेळगी, सोलापूर (श्रीधर भाऊराव सकळे आदर्श पिता पुरस्कार, रोख पाच हजार व सन्मानपत्र), श्याम नेमीनाथ पाटील, सोलापूर( चंपतराय अजमेरा युवा पुरस्कार, रोख दोन हजार व सन्मानपत्र), प्रणिता बाळासाहेब पांगरे, यळगुड (सावित्रीबाई राघोबा रोटे आदर्श त्यागी युवती पुरस्कार, दीड हजार रोख व सन्मानपत्र), अ‍ॅड.संजीवी शहा, सोलापूर (अ‍ॅड. सुमती व अ‍ॅड. अरविंद एन. पाटील कायदेतज्ज्ञ महिला पुरस्कार, रोख पाच हजार व सन्मानपत्र), सुनंदा ऊर्फ सुनीता राजेंद्र मगदूम, जयसिंगपूर (सुलोचना सिध्दाप्पा चौगुले आदर्श उद्योजिका पुरस्कार, रोख ११ हजार व सन्मानपत्र), आमदार ओमप्रकाश बच्चू कडू, बेलोरा, प्राणिमित्र विलास शहा, माढा व मनोरमा प्रेमचंद दोभाडा, अकलूज (विशेष सन्मान, प्रशस्तिपत्र, शाल व श्रीफळ).
येत्या २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता  सोलापुरातील श्राविका संस्थेत आयोजिलेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या ९३ व्या अधिवेशनाप्रसंगी हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.
या पत्रकार परिषदेस जैन सभेचे सरचिटणीस डॉ. राजेश फडकुले, डॉ. रावसाहेब पाटील यांच्यासह रमण दोशी, जीवनधर चौगुले, माधुरी पाटील आदींची उपस्थित होते.     

Story img Loader