कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सलग १२ दिवस डे-नाईट खेळवल्या गेलेल्या क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम सामन्यात अटीतटीची लढत होऊन येथील यंगस्टार क्रिकेट क्लबने पुण्याच्या तळजाई क्रिकेट संघावर ३२ धावांनी मात करून ‘कृष्णा चषक – २०१३ चषक’ आणि प्रथम क्रमांकाचे एक लाख एक हजारचे पारितोषिक पटकावले. डॉ. अतुल भोसले युवा संघटनेतर्फे या स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पध्रेचे बक्षीस वितरण डॉ. अतुल भोसले, सिनेअभिनेते अभिजित खांडकेकर, सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ नगरसेवक विनायकराव पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नगरसेवक महादेव पवार, श्रीकांत मुळे, राजेंद्र माने, स्मिता हुलवान, मोहसिन आंबेकरी, माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, अशोकराव पाटील, अतुल शिंदे, जयवर्धन देशमुख, विनोद भोसले, मोहसिन कागदी, यांची यावेळी उपस्थिती होती.
सदर स्पध्रेत महाराष्ट्रातून नामवंत संघ सहभागी झाल्याने या विभागातील ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली. स्पध्रेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने पंचांची नेमणूक केली होती. या स्पध्रेत यंग स्टार क्रिकेट क्लब, कराड यांनी प्रथम क्रमांकाचे १ लाख एक हजार अकरा रुपयांचे बक्षीस पटकावले. तळजाई, पुणे संघाने द्वितीय क्रमांकाचे ५०, १११, तर तृतीय आणि चौथ्या क्रमांकाचे बक्षीस साईना मुंबई व सहारा बी कराड यांनी पटकावले. ‘मॅन ऑफ दी मॅच’ किताब यंग स्टार क्लबच्या रफिक शेख याने तर यजाज कुरेशी याने ‘मॅन ऑफ दी सिरीज’ चा बहुमान पटकावला तसेच बेस्ट बॉलर अतुल डोंबळे, तर बेस्ट बॅटसमनचा बहुमान गणेश साळवी (तळजाई, पुणे) यांनी मिळवला.
प्रारंभी नंदकुमार जाधव यांनी स्वागत केले. तर सामना समितीचे अध्यक्ष इंद्रजित गुजर यांनी आभार मानले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोहित पवार, रशिद शेख, राजू शिंदे, राजू जाधव, अभिजित मोंडगिरी, धनंजय हिनकुले, शंतनू चव्हाण, सतीश घारे, अब्दुल आगा यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Story img Loader