यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे येथील विभागीय केंद्र आणि विश्वास बँक यांच्या वतीने कारगिल युद्धात भारतीय जवानांनी बजावलेल्या धैर्याचे व रोमहर्षक प्रसंगांचे दर्शन घडविणारा ‘कारगिल विजयगाथा’ या शौर्यकथनपर कार्यक्रमाचे आयोजन ६ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता केले आहे.पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते सुहास फडके हे शौर्यकथा कथन करणार आहेत. हा कार्यक्रम गंगापूर पोलीस ठाण्यावरील प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रात होणार आहे. सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या जवानांचे योगदान प्रत्येक भारतीयासाठी खूप मोलाचे आहे. कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन समर्पण भावनेने लढा देत राहणे हे प्रामाणिक कर्तव्य ते बजावत असतात. आजच्या तरुण पिढीला या जवानांचे कार्य प्रेरणादायी ठरावे यासाठी शौर्यकथा कथनाचे आयोजन करण्यात आले आहे. फडके यांनी सदर शौर्यकथा कथनाचे जवळपास २५० प्रयोग केले आहेत. कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक पाटील, सचिव अॅड. विलास लोणारी, कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर आदींनी केले आहे.
नाशिकमध्ये आज ‘कारगिल विजयगाथा’
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे येथील विभागीय केंद्र आणि विश्वास बँक यांच्या वतीने कारगिल युद्धात भारतीय जवानांनी बजावलेल्या धैर्याचे व रोमहर्षक प्रसंगांचे दर्शन घडविणारा ‘कारगिल विजयगाथा’ या शौर्यकथनपर कार्यक्रमाचे आयोजन ६ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता केले आहे.
First published on: 07-07-2013 at 12:08 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kargil winning story in nashik today