शहरातील सर्वच रस्त्यांवरील अतिक्रमाणे लक्षात घेता शहराबाहेरून ‘बायपास’ काढणे हाच पर्याय योग्य आहे. त्यासाठी शहरातील सर्वच राजकीय नेत्यांची मदत घेण्यात येणार असून प्रांतधिकारी व प्रभारी तहसीलदार यांच्यात समन्वय ठेवावा असे आवाहन व्यापाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरंपच सुनंदा पवार होत्या. उपसरंपच नामदेव राऊत, टपरी संघटना व काँग्रेसचे शहहराध्यक्ष बाळासाहेब साळूंके, विजय तोरडमल, सचिन घूले, नंदकुमार लांगोरे आदी यावेळी उपस्थित होते.
शहरातील मेन रोड, कुळधरन रोड, पंचायत समिती रोड, करमाळा रोड येथील अतिक्रमणे दूर करण्याची मोहिम सरकारी यंत्रणेने उघडली आहे. मात्र प्रातंधिकारी संदीप कोकडे यांनी या प्रश्नावर तोडगा काढला असताना त्यांच्या भुमिकेला छेद देणारा निर्णय प्रभारी तहसीलदारांनी घेतला आहे. त्यांनंी कोकडे यांनाच शह दिला आहे. या दोन अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावाने टपरीचालक मात्र अद्यापही संभ्रमात आहेत.
बैठकीत बोलताना नामदेव राऊत यांनी अतिक्रमणे काढण्याबाबतचे तहसीलदारांचे नियोजन स्पष्ट केले.  श्री. भैसडे यांचे हे काम प्रदीर्घ काळ चालेल. तोपर्यंत ग्रामंपचायत सर्व राजकीय पक्षांना बरोबर घेवून बाह्य़वळण रस्त्यासाठी प्रयत्न करील असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व टपरीधारकांनी आपले भाडे नियमीत भरावे, कारण ग्रामंपचायतीच्या कर्मचाऱ्यांना चार, पाच महिने पगार करता येत नाहीत. भाडे भरले नाही तर आता करार रद्द करू असा इशारा राऊत यांनी दिला.
टपरी संधटनेचे अध्यक्ष बाळासाहेब साळूंके म्हणाले, महसूल अधिकाऱ्यांनी परस्पर विरोधी विधाने करू नयेत, त्यामुळे गोंधळ होत आहे. कोणाही टपरीखाचकाचे दुकान हलणार नाही. आहे हा रस्ता मोठा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बाह्य़वळण रस्ता करण्यास तयार आहेत. सर्व प्रस्ताव तयार करून पाठवू तोपर्यंत रोजगार हमी योजनेतून काम पुर्ण करू असे आश्वासन साळूंके यांनी दिले.
गणेश जेवरे, रावसाहेब खराडे, सुरेश खिस्ती, नारायण दळवी, आदी व्यापाऱ्यांनी यावेळी सुचना मांडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा