प्रांतामार्फत पुन्हा चौकशी
तालुक्यातील बारडगावदडी येथील एकनाथ पाटील संस्थेने चाराडेपोत केलेला गैरव्यवहार अखेर विधानसभेत गाजला. आमदार राम शिंदे, अनिल राठोड व दौलत दरोडा यांनी नागपूर अधिवेशनात या संस्थेत झालेल्या एक कोटींच्या चारा घोटाळाप्रश्नी मुद्दा उपस्थित केला. वनमंत्री पतंगराव कदम यांनी यावर सभागृहात खुलासा केला.
बारडगावदडी येथील एकनाथ पाटील या संस्थेने चारा डेपोत गैरव्यवहार केला असून त्यामध्ये तहसीलदार सुरेश थोरात यांच्यासह मंडल अधिकारी, कामगार तलाठी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची तक्रार भाजपचे व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल शर्मा यांनी केली होती. माहितीच्या अधिकारात त्यांनी सर्व माहिती उघड केली होती. त्यावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात चर्चा झाली. याबाबत आमदार राम शिंदे, राठोड व दरोडा यांनी एकूण सात प्रश्न विचारले.
सरकारच्या वतीने त्याला उत्तर देताना पतंगराव कदम म्हणाले की, याबाबतच्या तक्रारीची मंडल अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली आहे. एकूण १ हजार २३४ लाभार्थ्यांपैकी ८८५जणांचे जबाब नोंदविण्यात आले असून ८८० लाभाथ्यार्ंनी चारा वाटपाबाबत तक्रार नसल्याचे सांगितले आहे. तक्रारदारांनी चौकशी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने उपविभागीय अधिकारी पुन्हा चौकशी करीत आहेत. तोपर्यंत या संस्थेचे ३४ लाख ६ हजार ६६२ रूपये अनुदान राखून ठेवण्यात आले आहे.    

Story img Loader