मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल अमीर कसाब याला बुधवारी सकाळी पुणे येथे येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याने त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी डोंबिवली पूर्व भाजपतर्फे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांचा साखरेचे वाटप करण्यात आले.
उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी साखर वाटून आंनदोत्सव साजरा केला. डोंबिवलीत भाजपचे शशिकांत कांबळे, अशोक जाधव व इतर कार्यकर्ते मोठय़ा संख्येने या उत्सवी आनंदात सहभागी झाले होते. रेल्वे स्थानकात प्रवेश करणारे चाकरमानी या आनंदात सहभागी होऊन लोकल प्रवासाला निघत होते.

Story img Loader