लाच घेताना पकडलेल्या तसेच अन्य कारणांमुळे महापालिका सेवेतून निलंबित झालेल्या एकूण १६ कर्मचाऱ्यांपैकी सात कर्मचाऱ्यांचे निलंबन कायम ठेवण्याचा निर्णय मंगळवारी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निलंबन आढावा समितीने घेतला. उर्वरित ९ कर्मचाऱ्यांचे निलंबन आढाव्यासाठी प्रलंबित ठेवण्यात आले. एका कर्मचाऱ्याला सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिका सेवेतून निलंबित कर्मचाऱ्यांच्या निलंबनावर निर्णय घेण्यासाठी आढावा समितीची महापालिकेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुनील जोशी, सुहास गुप्ते, रेखा शिर्के, तुकाराम भोईर, राजेश चंदने, आरमुगम काथान, नवनीत पाटील यांचे निलंबन कायम ठेवण्यात आले. लिपिक प्रशांत नरे या कर्मचाऱ्याला सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बाळू बोराडे, रमेश पौलकर, काका पाटील, बळीराम पाटील, अंजू अरसन, पेरूमल अरसन, विठ्ठल शिंदे, महम्मद खान या कर्मचाऱ्यांची प्रकरणे आढाव्याची मुदत पूर्ण झाली नसल्याने समितीने प्रलंबित ठेवली. आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. जोशी यांच्यावर लाच घेणे व बेहिशेबी मालमत्ता असे दोन अभियोग दाखल आहेत. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दाखल अभियोगाला सात महिने झाले आहेत. जोपर्यंत अशा अभियोगाला दोन वर्षे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अशा कर्मचाऱ्याच्या फेरप्रवेशाबाबत विचार करता येत नाही, असे बैठकीत सांगण्यात आले. तसेच सर्वसाधारण सभेने जोशी यांच्याबाबत जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत त्यांना निलंबित ठेवावे, हा ठराव बैठकीत ठेवण्यात आला.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा