केईएएम रुग्णालयात एका महिला डॉक्टरचा वॉर्डबॉयनेच लिफ्टमध्ये विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोईवाडा पोलिसांनी या वॉर्डबॉयला अटक केली आहे. पिडीत महिला डॉक्टर परळच्या केईएम रुग्णालयात काम करते. बुधवारी रात्री ही डॉक्टर तळमजल्यावरून लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी याच रुग्णालयात काम करणारा वॉर्ड बॉय पोपट भोवरे याच्यासह अन्य तीनजण या लिफ्ट मध्ये शिरले. पहिल्या मजल्यावर अन्य तीन जण बाहेर निघाले. त्यानंतर लिफ्ट मध्ये वॉर्डबॉय आणि ही महिला डॉक्टर असे दोघेच होते. त्या संधीचा फायदा उचलत पोपटने महिला डॉक्टरचा विनयभंग केला. डॉक्टरने त्याला प्रतिकार करताना लिफ्टचे बटन दाबून लिफ्ट थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही सेकंद लिप्ट दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यामध्ये अडकली होती. अखेर लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर आल्यावर लिफ्टचे दार उघडले आणि पोपटने पळ काढला. पण डॉक्टरने मदतीसाठी आरडाओरड केल्याने रुग्णालयात आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि सुरक्षा रक्षकाने पोपटला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी पोपट भोवरे घाटकोपर येथे राहणारा असून विवाहित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा