या वर्षीचा केशव भिकाजी ढवळे पुरस्कार ‘इंडिया प्रिटिंग वर्क्स’ला साहित्य संघ मंदिराच्या पुरंदरे सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. केशव भिकाजी ढवळे संस्थेचे अंजनेय ढवळे यांच्या हस्ते हा पुरस्कार आनंद लिमये यांना प्रदान करण्यात आला. रोख १० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याच कार्यक्रमात ढवळे प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सहा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रीय प्रवचनकार आणि कीर्तनकार सु. ग. शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ज्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यात ‘श्री स्वामी समर्थ’ (दिवाकर अनंत घैसास) या इंग्रजी पुस्तकासह ‘श्रीराम विजय कथामृत’ व ‘श्री गुरुचरित्रातील कथा’ (स्मिता पोतनीस), ‘श्रीमद्भागवत कथा’ (पुष्पा जोशी), ‘ईशावास्योपनिषद भावार्थ’ (प्र. सि. मराठे), ‘व्रतवैकल्य आणि धार्मिक सण’ (सविता गांगल व मेधा पटवर्धन-गोरे) या पुस्तकांचा समावेश आहे. अक्कलकोट येथील अप्पू महाराज हे प्रमुख पाहुणे तर रेखा नार्वेकर या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. कस्तुरी ढवळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
‘केशव भिकाजी ढवळे पुरस्कार’ इंडिया प्रिटिंग वर्क्सला प्रदान
या वर्षीचा केशव भिकाजी ढवळे पुरस्कार ‘इंडिया प्रिटिंग वर्क्स’ला साहित्य संघ मंदिराच्या पुरंदरे सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात
First published on: 29-11-2013 at 08:44 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keshav bhikaji dhavale award to india printing workers