नागपूर महोत्सवानंतर नागपूर महापालिकेच्यावतीने १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय महापौर चषक कबड्डी तर १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या आयोजनासंदर्भात क्रीडा व शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची महापौर प्रवीण दटके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यात स्पर्धेच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. खो-खो आणि कबड्डी स्पर्धेत देशभरातील संघ सहभागी होणार आहे. त्यामुळे त्यांची निवासासोबत अन्य व्यवस्था करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. खेळाडूंची कुठलीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीने क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन व्यवस्था करावी. बैठकीला अति. उपायुक्त प्रमोद भुसारी, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, डॉ. हंबीरराव मोहिते, प्रणय कोकाश, सुधीर निंबाळकर, बाळकृष्ण कुळकर्णी, सुनील चिंतलवार, क्रीडा निरीक्षक विजय इमाने, जितेंद्र गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा