जिल्हा किकबॉल निवड चाचणी स्पर्धा
नवरचना माध्यमिक विद्यालयाने येथे जिल्हा किकबॉल संघटनेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कनिष्ठ अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत दुहेरी मुकूट मिळविला.
नवरचना विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत २४० खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेचे उद्घाटन विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर व महाराष्ट्र समाज सेवा संघाचे सचिव सुधाकर साळी यांच्या हस्ते झाले.
विश्वास ठाकूर यांनी खेळामुळे शारीरिक विकास व व्यक्तीमत्व विकासास मदत होत असल्याचे सांगितले. स्पर्धेत वाघ गुरुजी विद्यालयाने उपविजेतेपद तर मुलींमध्ये सातपूरच्या जनता विद्यालयाने उपविजेतेपद मिळविले. नवरचना विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर पालखेडकर, पर्यवेक्षक सुनील गायकवाड, संघटनेचे कार्याध्यक्ष जे. पी. पवार, खजिनदार एस. के. वाटपाडे, सचिव एस. बी. आहेर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेत पंच म्हणून योगेश कराळे, अतुल गलांडे, निरंजन गायकवाड आदींनी काम बघितले. या स्पर्धेतून निवड झालेला संघ १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय किकबॉल स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्य़ाचे प्रतिनिधीत्व करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा