श्रीगोंदे तालुक्यातील चिंभळे येथील दलित मुलीवर बलात्कार करून तिला दिवस गेल्यानंतर गर्भपातासाठी आईसह या मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तेरा दिवसांनंतरही या मायलेकींचा ठावठिकाणा न लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी यासंदर्भात राहुल प्रकाश गायकवाड (वय २६) याला अटक केली असून त्यानेच हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणात सहभागी असलेले त्याचे वडील प्रकाश गुजाबा गायकवाड व मनीषा जयसिंग गायकवाड हे दोघे फरारी आहेत. अत्याचारग्रस्त मुलीच्या वडिलांनी यांनी याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, राहुल गायकवाड याने माझ्या मुलींवर बळजबरीने तिच्या मनाविरुद्ध वारंवार अत्याचार केला. त्यामुळे ती गर्भवती राहिली असून हा प्रकार प्रकाश गुजाबा गायकवाड, राहुल प्रकाश गायकवाड व मनीाषा जयसिंग गायकवाड यांना समजल्यानंतर त्यांनी दि. २१ जुलैला सकाळी माझी मुलगी व पत्नीचे अपहरण केले असून माझ्या मुलीने गर्भपात करावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. दि. २१ पासून प्रकाश, राहुल व मनीषा हे तिघेही गायब आहेत. या घटनेचा दलित संघटनांनी निषेध केला आहे. दरम्यान या परसिरात ही दुसरी घटना आहे. यापूर्वी गव्हाणेवाडी येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करण्यात आला होता.
गर्भपातासाठी मुलीसह तिच्या आईचे अपहरण
श्रीगोंदे तालुक्यातील चिंभळे येथील दलित मुलीवर बलात्कार करून तिला दिवस गेल्यानंतर गर्भपातासाठी आईसह या मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तेरा दिवसांनंतरही या मायलेकींचा ठावठिकाणा न लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.
First published on: 07-08-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidnapped girl for abortion with her mother