पावसाळ्यात मुंबईत पसरणाऱ्या साथीच्या आजाराबरोबरच आता शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर खड्डे मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाले आहेत. गेल्या आठवडय़ात खड्डय़ात पडून वाहनचालकाचा मृत्यू झाल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संपूर्ण मुंबईत सध्या सुमारे एक हजारांहून अधिक खड्डे असल्याचे समोर आले आहे.
गेल्या आठवडय़ात उमेश शिंदे या तरुण अभियंत्याचा खड्डय़ात पडून मृत्यू झाला. उमेशचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या या दुर्देवी मृत्यूमुळे तो राहात असलेल्या परिसरात हळहळ व महापालिकेच्या बेफिकीबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. उमेश अंधेरी येथील टाटा कंपाऊंडमध्ये राहात होता. कांदिवली येथील ठाकूर व्हिलेज येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडे तो नोकरी करायचा. कार्यालयातून स्कूटरवरून घरी परतत असताना रस्त्यातील खड्डयामुळे झालेल्या अपघातात तो मृत्यूमुखी पडला. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या ‘भाजप’ने गेल्या आठवडय़ात रस्त्यावर उतरून ‘खड्डे भरा’ आंदोलन केले होते. मुंबई शहरभरात १,० ५० खड्डे पडले असून ते अद्याप बुजविले नसल्याचे सांगण्यात येते. महापालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांनी खड्डय़ांचे छायाचित्र पाठवावे, त्याची दखल घेऊन हे खड्डे बुजविले जाकील, असे आवाहन केले आहे. जून महिन्याच्या अखेपर्यंत अशा प्रकारे ७ हजार १८० खड्डे पडल्याच्या तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ४,४१२ खड्डे बुजविले असून १,०५७ खड्डे अद्याप बुजवायचे बाकी असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
महापालिकेने मुंबईकरांना खड्डय़ांची छायाचित्रे संकेतस्थळावर पाठवून तक्रार करण्याचे आवाहन केले असले तरी ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल आहे, तेच आपल्या मोबाईलवरून अशी तक्रार करू शकतात. ज्यांच्याकडे असे मोबाईल नाहीत, त्यांनी काय करायचे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान पालिकेकडे खड्डय़ाची तक्रार आल्यानंतर आम्ही ४८ तासांत त्याची दखल घेऊन ज्या रस्त्यावर खड्डा पडला आहे, तेथील कंत्राटदाराला त्याबाबत सूचना देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देतो, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
जिंकली रे! श्रीलंका ९६ मध्ये गारद…
तिरंगी मालिकेतील भारत विरूध्द श्रीलंका सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेला ९६ धावांमध्ये गुंडाळत अखेर अंतीम फेरीत प्रवेश मिळाला. पावसामुळे सामना २६ षटकोंमध्ये मर्यादीत करण्यात आला होता. श्रीलंकेला २६ षटकांमध्ये १७८ धावा करण्याचे आव्हान पेलवले नाही. श्रीलंकेचा संपूर्ण संघ २५ व्या षटकामध्ये अवघ्या ९६ धावांमध्ये गारद झाला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २९ षटकांमध्ये ३ बाद ११९ धावा केल्या. पावसामुळे सामना मर्यादीत षटकांचा करण्यात आला होता. श्रीलंकेसमोर २६ षटकांमध्ये १७८ धावा करण्याचे आव्हान होते. मात्र, श्रीलंकेच्या संपूर्ण संघाला २५ व्या षटकामध्ये अवघ्या ९६ धावांमध्ये बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले. तिरंगी मालिकेचा अंतीम सामना भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानच खेळला जाणार आहे. गुरुवारी त्रिनीदाद, पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल, या आजच्याच मैदानावर दोन्हीसंघ आमने-सामने येतील. श्रीलंकेच्या आजच्या पराभवामुळे भारताच्या खात्या मध्ये अतिरीक्त २ गुणांची भर पडली आहे.               

मुंबईतील काही प्रभागांमधील खड्डय़ांची संख्या  
एल- ३८७
जी-उत्तर- ३६९
एस-३०३
के-पश्चिम- २८९
एफ -उत्तर- २८०