पुण्याच्या नटसम्राट बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे देण्यात येणारा कै. अण्णासाहेब किलरेस्कर पुरस्कार ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक आणि कलावंत डॉ. रंजन दारव्हेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. विदर्भात प्रथमच हा पुरस्कार डॉ. दारव्हेकर यांना मिळाला आहे.
रंजन कला मंदिरच्या माध्यमातून डॉ. रंजन दारव्हेकर यांनी व्यावसायिक आणि हौशी नाटके सादर केली असून अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. राज्य नाटय़ महोत्सवात त्यांना दिग्दर्शनाची आणि अभिनयाची पारितोषिके मिळाली आहेत. नवीन पिढीचा नाटय़कलेकडे ओढा वाढावा या दृष्टीने त्यांनी नाटय़ शिबिरे आयोजित करून त्या माध्यमातून नवोदित कलावंताना त्यांनी नाटकात संधी दिली. मराठी संगीत रंगभूमीच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्या योगदानाची दखल घेऊन त्यांना अण्णासाहेब किलरेस्कर पुरस्काराने येत्या १४ जुलै रोजी पुण्यात होणाऱ्या एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात येईल. यापूर्वी हा पुरस्कार अमेरिकेतील मीना नेरुळकर यांना देण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा